प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी तिसऱया रेल्वेगेटजवळील हॉटेल ‘नेटिव्ह बाय चॅन्सरी’ येथे फॅशनव्या या फॅशोनिस्टा आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 26 ऑगस्ट रोजी या प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून ते शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत खुले आहे.
फॅशोनिस्टा ही फॅशनप्रेमींची कंपनी असून 2008 पासून ती कार्यान्वित आहे. आजपर्यंत या कंपनीने 35 शहरांत 300 हून अधिक प्रदर्शने भरविली आहेत. कंपनीला उत्कृष्ट प्रदर्शनांसाठी ‘द चॅलेंजर गोल्ड ऍवॉर्ड 2020’ ने गौरविण्यात आले आहे.
प्रदर्शनात देशभरातील नामवंत संस्थांचे स्टॉल्स आहेत. परंपरा आणि नाविन्यता यांचा मिलाफ साधणारी वस्त्रप्रावरणे व मुंबई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, पुणे, चंदीगड, आग्रा, अहमदाबाद, बेंगळूर, गोवा, सूरत, हैद्राबाद व इंदोर येथील साडय़ा, वेस्टर्न वेअर, पादत्राणे, बेडशीट्स, कार्पेट, ज्युवेलरी यांचा समावेश आहे.