सध्याच्या ऋ तूबदलाच्या काळात दिवसभर उकाडा आणि रात्री काहीही थंडी अनुभवायला मिळते आहे. संध्याकाळी बरेचदा गार वारेही वाहतात. थोडय़ा थंडाव्याची जाणीव होत असते. अशा वेळी फार गरम कपडे घालावेसे वाटत नाहीत. या दिवसात थोडीफार ऊब मिळवण्यासह स्टायलिश दिसण्यासाठी काही फंडे वापरता येतील.
- कडक ऊन आणि सोबतीला थंड वारा वाहत असेल तर कोटिगन्सचा पर्याय निवडता येईल. कोटिगन्स हा कोट आणि कार्डिगॅनचा ट्रेंडी पर्याय ठरू शकतो. कोटिगन्स थोडे लांब असतात. कोटिगन घातल्यानंतर थोडीफार ऊबही मिळते.त्यामुळे या दिवसात स्टायलिश दिसण्यासाठी कोटिगन्स खरेदी करायला हरकत नाही.
- जीन्स आणि शॉर्टसचं मिश्रण म्हणजे जॉर्टस. हा प्रकार खूपच आकर्षक दिसतो. भटकंतीला जाताना जॉर्टस घालता येतील शॉर्टसइतकं तोकडं आणि जीन्सइतकं लांब घालायचं नसेल तर जॉर्टस ट्राय करता येतील.
- शर्ट आणि जॅकेट्सचं मिश्रण म्हणजे शॅकेट्स. थोडय़ाफार थंडीत शॅकेट्स घालता येतील. प्लेन, चेक्सवाले किंवा स्ट्राईप्सवाले शॅकेट्स घालता येतील. शॅकेट्ससोबत स्ट्रेट पँट किंवा ट्राउझर घालता येईल.
- रोबिगन हा प्रकारही चांगलाच इन आहे. मध्यंतरी बर्याच हॉलिवूड सेलेब्जनी रोबिगन घातला होता. थंडीतल्या लेअरिंगसाठी रोबिगन घेता येतील.