वृत्तसंस्था/ लंडन
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्याने स्पष्ट केले.
पुढील महिन्यात 41 व्या वर्षात पदार्पण करणाऱया फेडररने मागील वर्षी गुडघ्यावर दोनदा शस्त्रक्रिया करवून घेतल्या होत्या. त्यातून सावरण्यासाठी त्याला सुमारे वर्षभराचा कालावधी लागला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तेरा महिन्यांनी यावर्षी मार्चमध्ये तो पुन्हा कोर्टवर उतरला होता. त्याने मागच्या महिन्यात झालेल्या पेंच ओपन स्पर्धेत तिसरी फेरी गाठूनही त्याने विम्बल्डनसाठी माघार घेतली होती. मात्र विम्बल्डनमध्येही त्याला उपांत्यपूर्व फेरीत हय़ुबर्ट हुर्काझकडून पराभव पत्करावा लागला होता. फेडररने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्टॅन वावरिंकासमवेत दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले होते तर लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. टोकियो ऑलिम्पिकमधून अनेक टेनिसपटूंनी माघार घेतली असून त्यात राफेल नदाल, डॉमिनिक थिएम, वावरिंका, निक किर्गिओस, सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप, कॅनडाची बियान्का अँड्रेस्क्यू, ब्रिटनची जोहाना कोन्टा, बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन यांचा समावेश आहे.