11 डिसेंबर रोजी हेडक्वार्टर, झोनल ऑफिससमोर निदर्शने
प्रतिनिधी/ रत्नागिरी
फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनने आपल्या विविध न्याय हक्क व मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिससमोर धरणे आंदोलन केले. रत्नागिरीतही बँक कर्मचारी या आंदोलनात एक दिवसाची रजा टाकून दिवसभर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्व प्रकारानेही जर व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 11 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व जिह्यातील हेडक्वार्टर व सर्व झोनल ऑफिससमोर निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर 2 दिवसांचा संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारला होता. पुरेशा प्रमाणात क्लार्क, शिपाई, होमगार्ड यांची भरती करा, करियर प्रोग्रेशन, उच्च व्यवस्थापन कर्मचारी यांच्यासोबत सापत्न वागणूक, कर्मचारी विरोधातील माईंड सेट, अधिकारी व अवार्ड स्टाफ यांना पेट्रोल दिले जाते. त्याचे प्रमाण व्यस्त आहे ते योग्य करा, हेल्थ चेकअप, पॅज्युअल वर्करना बँकेच्या सेवेत सामावून घ्या व कायम करा. अधिकाऱयांना दिले जाणारे फर्निचर त्याप्रमाणे अवार्ड स्टाफ यांना द्या, आऊटसोर्सिंग बंद करा. द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करू नका, बँक खासगीकरणाच्या दिशेला जात आहे ते त्वरित थांबवा, मोठमोठे थकित कर्जदार आहेत, त्यांच्याकडून कर्ज वसुली करा. ओटीएसमध्ये बँकेचा तोटा होत आहे तो वाचवा. चांगली कर्ज वाटप करा, बँक सक्षम करा. परंतु त्याचा बँक व्यवस्थापनावर कोणताही परिणाम न झाल्याने फेडरेशनने पुन्हा बँक व्यवस्थापनाविरुद्ध प्रोटेस्ट (निषेध) पॅलेंडर जाहीर केले आहे.
निषेध पॅलेंडरनुसार 15 ऑक्टोबरपासून संघटनेने नियमित कामाच्या व्यतिरिक्त जादा सहकार्य न करण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे 22 ऑक्टोबरला सायंकाळी बँकेचे कामकाज संपल्यानंतर देशभरातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिससमोर निषेधार्थ प्लेकार्ड दाखवून निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर झोनल मॅनेजर यांची मास डेप्युटेशनद्वारे भेट घेवून संघटनेने दिलेल्या विविध मागण्यांची यादी प्रधान कार्यालयात पाठवण्यासाठी देण्यात आली होती. 2 ते 7 नोव्हेबर देशभरातील सर्व शाखांमधून मागण्यांचे बॅच काळ्या रिबनसहित व तोंडावर काळे मास्क लावून निषेध आठवडा साजरा करण्यात आला. निषेधाचा भाग म्हणून 5 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या झोनल ऑफिससमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतील बँक ऑफ इंडियाच्या झोन ऑफिस शिवाजीनगर येथे दिवसभर हे आंदोलन करण्यात आले.
..