वृत्त संस्था/ चेन्नाई
नोव्हेंबर महिन्यात भारतात सुरू होणाऱया इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी चेन्नीयन एफसीशी संघाने मिझोरामचा बचावफळीत खेळणारा 31 वर्षीय फुटबॉलपटू एल.फेनाई आणि मणिपूरचा 29 वर्षीय फुटबॉलपटू रिगन यांच्याशी नवा करार केला आहे.
फेनाई आणि रिगन सिंग यांच्या समावेशामुळे चेन्नीयन एफसी संघ अधिक बलवान झाला आहे. चेन्नीयन एफसी संघाने यापूर्वी ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे. फेनाईने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीला आय लीग स्पर्धेत खेळणाऱया पंजाबच्या जेसीटी संघाकडून प्रारंभ केला होता. त्यानंतर त्याने शिलाँग लेजाँग तसेच बेंगळूर एफसी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नाईने मुंबई सिटी एफसी तसेच पुणे सिटी एफसी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2019-20 च्या फुटबॉल हंगामात तो ओदिशा एफसी संघाकडून खेळत होता.