नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत बायोटेकची कोरोनावरील लस फेब्रुवारीमध्ये येणार असल्याचे संकेत संशोधकांकडून मिळाले आहेत. अपेक्षित चाचण्या पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत लस येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी पुढील वर्षाच्या दुसऱया तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जूनपर्यंत भारत बायोटेकची लस उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. सध्या भारत बायोटेक लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. चाचणीतील आतापर्यंतचे परिणाम सुरक्षित व प्रभावी राहिले आहेत. ही कंपनी सरकारच्या सहकार्याने लस तयार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकला लस तयार करण्याचे काम वेगवान करण्यास सांगितले होते.