नवी दिल्ली
वर्षाच्या आधारावर पाहता वाहन नोंदणीमध्ये मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घट झाली असल्याचे दिसून आले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आपल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये वाहन नोंदणी 13 टक्क्यांनी घटून 14.99 लाख इतकी झाली आहे. मागच्या वषी याच महिन्यामध्ये 17.31 लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. जानेवारी 2019 मध्ये 15.92 लाख वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. दुसरीकडे ट्रक्टर नोंदणीमध्ये फेब्रुवारीमध्ये 18 टक्के इतकी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 61 हजार 351 ट्रक्टर्सची नोंदणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे तीन चाकी वाहने आणि व्यावसायिक वाहनांची नोंदणी अनुक्रमे 49 टक्के आणि 29 टक्के इतकी घटली आहे.