टिकटॉक ठरले सर्वाधिक डाऊनलोड होणारे ऍप
नवी दिल्ली –
मागच्या वर्षामध्ये चीनी ऍप टिकटॉकवर भारतासह जगातील अन्य देशांनी निर्बंध लावले होते. याचा परिणाम म्हणून चिनी ऍप मोठय़ा प्रमाणात मोबाईलमधून अनइन्स्टॉल (काढून टाकले) करण्यात आले होते. परंतु आताच्या घडीला हेच टिकटॉक ऍप जगातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे सोशल मीडिया ऍप बनले आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान या ऍपचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे, तसेच युरोप आणि अमेरिकेत टिकटॉकला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. या अगोदरची स्थिती पाहिल्यास फेसबुकने आपले स्थान कायम ठेवले होते.
मागच्या वर्षातील कामगिरीतही टिकटॉक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिस्टमध्ये अव्वलस्थानी राहिली होती. टिकटॉकची सुरुवात ही वर्ष 2020 च्या सुरुवातीला केली होती. तेव्हापासून फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम आणि मॅसेंजर यांना अमेरिकेतही टक्कर देत राहिले आहे.