प्रतिनिधी / बेळगाव
फेसबुक प्रेंड्स सर्कलने वनखात्याच्या साहाय्याने तीन पिंजऱयांतील तीन पोपटांना मुक्त करून वनखात्याच्या ताब्यात दिले. पक्ष्यांना कैद करू नका, पिंजऱयात डांबू नका, असे आवाहन फेसबुक प्रेंड्स सर्कलने केले आहे. सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या पुढाकाराने सदर पोपट वनाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, शिवानंद मगदूम, सुरक्षा रक्षक एम. ए. किल्लेदार, रमेश गिऱयाप्पन्नावर, विनयगौडर यांच्या उपस्थितीत सर्व पोपटांना पिरनवाडी नजीकच्या जंगलात सोडण्यात आले. पक्ष्यांना डांबून ठेवण्याची पद्धत चुकीची असून त्यांना मुक्त हवेत विहार करू द्या, असे दरेकर यांनी सांगितले आहे.