प्रतिनिधी / बेळगाव
सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या फेसबुक प्रेंड्स सर्कलने शहरातील विविध सेवाभावी संस्थांना जीवनावश्यक साहित्याची मदत केली आहे. या अंतर्गत हय़ुमॅनिटी फौंडेशनला एक क्विंटल सोनामसुरी तांदूळ, 50 किलो कांदे, 50 किलो बटाटे, सेवा फौंडेशनला 50 किलो कांदे, महांतेशनगर येथील मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. यासाठी त्यांना एपीएमसी येथील व्यापारी नकुल व विश्वास टुमरी, मनोज मत्तीकोप, राजू व संजय पाटील, अभिजीत मोरबले, हेमंत पाटील, महेश कुगजी यांचे सहकार्य लाभले. सर्कलचे संतोष दरेकर, व्हिक्टर फ्रान्सीस, मेरी ठाकुर, जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी परिश्रम घेतले.