फेसबुक मित्रापासून गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस
येथे एका निर्जनस्थळावर नेऊन युवतीवर बलत्कारप्रकरणी दोघां युवकांना फोंडा पोलिसांनी काल बुधवारी अटक केली आहे. उस्मान आदाम सय्यद (26, पोस्तवाडा-होंडा सत्तरी) व सायजू जॉय वर्गिस (28, मूळ तामिळनाडू, रा. पोस्तवाडा होंडा) अशी संशयितांची नावे आहेत. सदर घटना महिन्यापुर्वी जूनच्या पहिल्या आठवडय़ात घडली होती. याप्रकरणी सदर कृत्यासाठी वापरलेले कारगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत युवती संशयित उस्मान यांची फेसबुक मैत्रिण आहे, या मैत्रीतून पुढील प्रकार घडला. उस्मान हा टिप्पर चालक आहे. घटनेच्या दिवशी तो खडीवाहू टिप्पर घेऊन मडगांव येथे गेले असतानाही पिडीत युवतीने त्याला सोबत केली होती. वाहन खाली करून आल्यानंतर दोघेही टिप्परने होंडा येथील उस्मानच्या अन्य मित्र सायजू यांच्याकडे गेली होती. त्यानंतर सायजुच्या कारगाडीने चोर्ला घाटची सैर करून परत आली होती. नंतर तिघेही जण उसगांव येथील निर्जळस्थळ गाठून कारगाडीतच दोघा संशयितांनी आळीपाळीने तिच्यावर बलत्काराचे कृत्य केले होते.
आलीशान कारच्या काळय़ा काचावर पोलिसांचे मवाळ धोरण
सदर पिडीत युवती मागील चार महिन्यापासून उसगांव येथील एका मित्रांच्या नातेवाईकांकडे राहत आहे. ती केअरटेकर म्हणून काम करीत होती. फेसबुकच्या माध्यामातून झालेल्या मैत्रीतून होंडा सत्तरी येथील संशयित मूळ पेडणे येथील पिडीत युवतीला काळाकुट्ठ काचाच्या हय़ुदाई सेन्ट्रो जीए 04 ई 5077 कारगाडीतून उसगांव येथील निर्जनस्थळ गाठून तिथेच कारगाडीतच दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर घटनेनंतर वाहतूक पोलीस काळयाकुट्ट काचाच्या आलीशान कारगाडय़ावर करण्याचे धाडस करणार काय? असा सवाल उपस्थित होतो. कारण काळय़ा काचाचे बहुतेक व्हीआयपी असून त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांचे हात आखडतात.
गरोदर निदान झाल्यानंतर बलात्काराचा गौप्यस्फोट
संशयित उस्मान याची पिडीत युवतीकडे फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. सदर युवती केअरटेकर म्हणून अडल्या नडलेल्या मदतीसाठी पावत असे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीनंतर संशयिताला उसगांव येथे भेटली होती. त्यानंतर सदर प्रकार घडला. या घटनेनंतर ती पेडणे येथील आपल्या मूळगावी गेली होती. जुलै महिन्यात अचानक तीला बरे वाटत नसल्यामुळे आईसह सरकारी इस्पितळात गेली होती. यावेळी ती गरोदर असल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यामुळे सदर घटनेचा गौप्यस्फोट झाला. सरकारी डॉक्टारांनी पेडणे पोलीसांना कळविल्यानंतर व पिडीतेच आईने रितसर तक्रार दाखल केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयितांना चोवीस तासात होंडा सत्तरी येथून अटक केली आहे. दोन्ही संशयितावर भा.दं.सं. 376 (ड) व 506(2) कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपअधिक्षक नेल्सन अल्बुकर्क, पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे.