सध्याचा काळ कोणतेही काम झटपट करण्याचा आहे. याच झटपटीच्या नादात कित्येकदा मुख्य बाबींची पडताळणी करणे राहून जाते आणि संकट कोसळते. उत्तर प्रदेशातील नौबस्ता येथील एक युवती आणि नबागगंज येथील युवक यांची फेसबूकवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि पेमाची सांगता विवाहात झाली. हा विवाह दोघानीही घरी न सांगताच केला. तसेच त्याची नोंदणीही केली होती. नंतर युवती गर्भवती झाली. यानंतर या युवकाने आपल्या पत्नीला घरी नेले. आणि आपल्या आई वडिलांची ओळख करून दिली. तथापि सासूने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. तिने नकार दिल्यावर तिला कोल्ड्रिंकमधून औषध पाजण्यात आले. यामुळे तिचा गर्भपात झाला. आता हे प्रकरण पोलीस स्थानकात गेले आहे. युवतीने आपला पती आणि सासू यांच्या विरोधात भ्रूणहत्येचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची चौकशी होत आहे. आततायीपणाचे फळ कसे मिळते याचे ते ज्वलंत उदाहरण आहे असे पंचक्रोशीत बोलले जात आहे.
Previous Articleनवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !
Next Article आदर्श शिंदेच्या आवाजात घुमणार ‘हे गणराया’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.