30 वर्षापुर्वीच्या निष्ठावंतांचा क्रियाशील गट बरखास्त का ? : फेररचनेनंतरही अरूण गुडेकर यांची अध्यक्षपदी निवड व्हावी
प्रतिनिधी /फोंडा
संपुर्ण गोव्यात कॉग्रेस पक्षासाठी उत्तम कार्य करीत असलेल्या फोंडा गट कॉग्रेस समिती अचानक बरखास्त केल्याप्रकरणी पदाधिकाऱयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सद्या गोवा भेटीवर असलेले कॉग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांची फोंडा गट कॉग्रेसच्या पदाधिकाऱयांनी मडगाव येथे भेट घेत गांभीर्यांने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
फोंडा तालुक्यासाठी नवीन गट समितीची निवड केल्यास निष्ठावंत कॉग्रेस कार्यकर्त्याचा विचार व्हावा व अरूण गुडेकर यांचीच गटाध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी दक्षिण गोवा जिल्हा कॉग्रेस समितीचे सरचिटणीस जॉन परेरा यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फोंडा गट समितीचे अध्यक्ष अरूण गुडेकर, सचिव किशोर नाईक, उपाध्यक्ष हुसेन मुल्ला, शब्बीर शेख, आचल वेरेकर, संजीता नाईक, दिलीप नाईक, जुझे जॉयझ उपस्थित होते. कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कोणतीही पुर्वकल्पना, नोटीस न देता फोंडा गट कॉगेस समिती बरखास्त केलेली आहे. समितीची पुर्नबांधणी करताना मागील तीस वर्षापासून कॉग्रेसबरोबर निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा अशी मागणी केली आहे.
मडकई, शिरोडा, कुठ्ठाळी येथे गट समितीची गरज
विधानसभा निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपली असताना गट समिती बरखास्त करणे योग्य नसल्याची व्यथा सद्या गोवा दौऱयावर गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याकडे मडगांव येथील ग्रेस मॅजस्टिक येथे भेट घेऊन मांडली आहे. याप्रकरणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. तसेच आमदार रवी नाईक या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आचच्या परिस्थितीत फोंडा तालुक्यातील मडकई व शिरोडा येथे कॉग्रेसची गट समिती निवडण्याची गरज आहे. कुठ्ठाळी येथे कॉग्रेस समितीची स्थापनेची गरज आहे. अशा परिस्थितीत मागील 30 वर्षापासून उत्तम काम करीत असलेल्या फोंडा गट कॉग्रेस समिती बरखास्त करण्यामागील कोणते राजकारण हे न समजण्यापलीकडे असल्याचे सांगितले. पक्ष संघटना बळकट करताना फोंडय़ातील युवा कार्यकर्त्यांना सामावून घेतानाही गट कॉग्रेस समितीला विश्वासात घेतले नसल्याचा दावा पदाधिकाऱयांनी केला.
फोंडय़ातील गट कॉग्रेस बरखास्तीमागील नेमके राजकारण काय?
फोंडा मतदारसंघात विद्यमान कॉग्रेसचे आमदार रवी नाईक आहेत. त्यांचे सुपुत्र पालीकेचे नगरसेवक रितेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्ष बळकट करण्याहेतूने युवा कार्यकर्ते तथा गोवा फॉरवर्डचे राजेश वेरेकर यांना कॉग्रेस पक्षात प्रवेश दिलेला आहे. दिगंबर कामत यांनीही याला हिरवा कंदील दाखविलेला आहे. या पार्श्वभूमीवरच फोंडय़ातील गट कॉग्रेस बरखास्त केल्याचे तर्क लावाण्यात येत आहे. विद्यमान आमदार रवी नाईक कोणती राजकीय खेळी करतात यावर भविष्यातील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.