महालक्ष्मी नागरिक समितीचा चित्ररथ प्रथम : लोकनृत्य गटात सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी प्रथम
प्रतिनिधी /फोंडा
गोवा सरकार आणि फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरिय रोमटामेळ, व चित्ररथ व लोकनृत्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. रोमटामेळ स्पर्धेत आडपईच्या सुयोग शिमगोत्सव मंडळाने बाजी मारली असून चित्ररथ स्पर्धेत महालक्ष्मी नागरिक समिती प्रथम, तर लोकनृत्यात सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे रोमटामेळ स्पर्धेत आडपई येथील सुयोग शिमगोत्सव मंडळ यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. कुडचडे काकोडा शिमगोत्सव मंडळ यांना द्वितीय, श्री स्वर साई शिमगोत्सव मंडळ म्हापसा यांना तृतीय, सावर्डे शिमगोत्सव मंडळ यांना चौथे, श्री पाईकदेव शिमगोत्सव मंडळ सांगे यांना पाचवे, त्याशिवाय बार्देश शिमगोत्सव समिती, डोंगरी शिमगोत्सव समिती, श्री शांतादुर्गा शिमगोत्सव समिती कळंगुट यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
चित्ररथ स्पर्धेत महालक्ष्मी नागरिक समिती प्रथम
चित्ररथ स्पर्धेत बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीच्या चित्ररथाल प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय साई बाल मंडळ दुर्गाभाट फोंडा, तृतीय श्री गजानन कला मंडळ कपिलेश्वरी यांना तर ब्रह्मेश्वर युवक संघ आखाडा, श्री दामोदर महालक्ष्मी कला संघ बांदोडा, श्री देव दाडेश्वर स्पोर्टस् ऍन्ड कल्चरल क्लब नेरूल बार्देश, श्री सिद्धेश्वर कला मंडळ बेस्तोडा, सरस्वती युथ क्लब दाग फोंडा यांना उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय, तिसरे, चौथे व पाचवे देण्यात आले. त्याशिवाय रायेश्वर युवक संघ राय, श्री सातेरी युवक संघ मेरशी, महालक्ष्मी क्रिएशन सांगे, बाल गोपाळ सांस्कृतिक मंडळ चिंबल, देवतेवाडा युवक मंडळ कुडचडे, युनायटेड बॉएज कुर्टी फेंडा यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली.
लोकनृत्यात सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी प्रथम
लोकनृत्य गटात प्रथम पारितोषिक कुर्टी फोंडा येथील सरस्वती कला मंडळ यांना प्राप्त झाले. द्वितीय सावईवेरेच्या सख्याहरी, गुरूकला मंडळ पिसगाळ यांना तृतीय, तसेच नवदुर्गा कला आणि सांस्कृतिक मंडळ मडकई, यशलीला कल्चरल असोसिएशन प्रियोळ, श्री विघ्नेश्वर कला मंडळ काणकोण, शिवगर्जना ढोल ताशा लेझिम फथक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
वेशभूषा स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम दित्या दुर्गेश शिरोडकर, द्वितीय अन्या अजय सहकारी, तृतीय लक्ष सुरेंद्र नाईक तसेच तनुश्री वाडीकर, रूद्र दुर्गादास नाईक, रूत्वी संतोष नाईक, प्रज्ञा कुडव, शर्वी सर्वेश नाईक, साक्षी सुभाष पागी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली. सिनीयर गटात प्रथम प्रमोद मोर्लेकर, द्वितीय योगराज गोवेकर, तृतीय संदेश नेरी नाईक त्याशिवाय रामचंद्र सदानंद गावनकर, सिद्धेश मराठे, अनुष्का मोरसकर, अनुपचंद्र मडकईकर, मंथन गावस, तेजा नाईक, प्रभाकर चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. 19 मार्च रोजी झालेल्या शिमगोत्सव मिरवणूकीत 14 चित्ररथ देखावे, 8 रोमटामेळ व 7 लोककला पथकांनी तर वेशभूषा सिनियर गटात 23 जणांनी व ज्युनिअर गटात 16 जणांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.