प्रतिनिधी / फोंडा :
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून फोंडा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. फेंडा पोलीस स्थानकाला कोरोनानंतर आता डेंगुची लागण झाल्याने सुमारे पंधराहून अधिक पोलीस कर्मचारी आजारी पडलेले आहे. स्थानक परिसरात विविध गुन्हय़ाखाली अडकलेली व सद्या भंगारात जमा झालेली वाहने पावसाळय़ात डेंग्यूचे आगर बनत आहे. फोंडय़ात कोरोनानंतर डेंगूची लागण मोठया प्रमाणात होण्याची भीती असून फोंडा पोलीस स्थानक परीसरात र्निर्जंतुकीकरण औषधाची फवारणीसह परिसर स्वच्छ राखण्याचे आव्हान पेलीस स्थानकावर उभे ठाकले आहे.
फोंडा पोलीस स्थानकात 1 जुलैनंतर सुमारे 40 कोरोनाचे रूग्ण सापडले होते. त्यानंतर फोंडा तालुक्यातही कोरोना रूग्णात भर होत गेली. पोलीस स्थानकात कोरोना रूग्ण सापडल्याने येथे डय़ुटी बजावणाऱय़ा सर्व पोलीसांनीही त्यावेळी धास्ती घेतली होती. कुटूंबियांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काहीजणांनी पोलीस स्थानकात तसेच इतर ठिकाणी राहण्याची सोय करून घेतली होती. त्य़ामुळेही इतर पोलिसांचे स्वास्थ बिगडले की काय? अशी शंका काहींना येऊ लागली आहे. पोलीस कर्मचारी कोरोनापासून सावरत असताना डेंग्यूने डोके वर काढले असून अनेक कर्मचारी आजारग्रस्त बनले आहे.
15 जणांना डेंग्यू पैकी काहीजण पुर्वी कोरोनाबाधित आहेत.
सद्यपरिस्थितीत एकूण 15 जण डेंग्यूच्या नावाने आजारी रजेवर आहेत. डेंगूने ग्रासलेल्यापैकी बहुतेकांना पुर्वी कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. डय़ुटीवर रूजू झाल्यानंतर त्यांना डेंगूची लक्षणे दिसायला लागली होती.
स्थानक परीसरात कचऱयाचे ढिंग साचले असून अनेक अपघातातील जप्त केलेली वाहने भंगार झाली असून पावसाळय़ात सर्वत्र पाणी साचत आहे. स्थानकाला लागूनच ओहोळ असून तोही दुषित झालेला आहे. येथेही मोठय़ा प्रमाणात डांसाची पैदास होत आहे. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी झटणाऱया पोलिसांना कोरोनानंतर डेंगूने ग्रासल्याने पेलीस स्थानकात नाउमेदीचे वातावरण आहे.
कोरोनानंतर हाल, आता डेंग्यूचा धोका
जुलै महिन्यात पोलीस स्थानक कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्यानंतर येथे काम करणाऱय़ा कर्मचाऱयासाठी विलगीकरणासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या कुटूंबियापर्यंत कोरोनाची लागण झाली होती. अजूनही एक दोन कोरोना रूग्ण असून सद्यपरिस्थितीत डेंग्यूने डोके वर काढले आहे. आरोग्य खात्याच्या परवानगीनुसार केवळ दोघाजणांना डेंगूची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली असून वास्तव परिस्थिती एकूण 15 जण डेंग्यूचे शिकार बनले आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उधार होऊन कर्तव्य बजावले. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे असे आवाहन सरकार करते, त्यावेळी पोलिसांनी रस्त्यावर सतर्क रहावे लागते, त्यावेळी डांसापासून संरक्षणांसाठी कोणतीच उपाययोजना नाही. पोलीस खातेही याकडे गंभीरतेने बघत नसल्याची खंतही काही पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोग्य अधिकाऱयाना मिळणाऱया सुविधेइतक्या पुरेश्या सुविधा तरी पोलिसांना प्राप्त कराव्या असा काही पोलिसांचा सुर आहे.
आजारग्रस्त कर्मचाऱयांनी डेंग्यूचे प्रमाणपत्र सादर करावे
सणासुदीच्या ते निवडणूकापर्यंत, कायदा सुव्यवस्था ते तंटे थोपविण्यासाठी पंट प्रुटवर काम करणाऱया पोलिसांवरच स्वत:च्या आरोग्याची स्वत: काळजी घ्यावी लागत आहे. काही पोलीस कर्मचारी कोरोनाच्या दहशतीखाली डेंग्यूच्या नावाची ढाल वापरत असून त्य़ा सर्वांना आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे असा आदेश निरीक्षकांनी काढला आहे.
फोंडय़ाचे निरीक्षक हरीष मडकईकर कोरोना मुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांनी संपुर्ण पोलीस स्थानक परिसरात जंतुनाशक फवारणी करून घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच कोरोना व डेंग्यूशी लढणाऱय़ा प्रत्येक पोलीस कर्मचाऱयानी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.