प्रतिनिधी /पणजी
फोंडा येथे श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे कर्णबधीर मुलांनी ख्रिसमस सण उत्साहात साजरा केला. या संस्थेतर्फे कर्णबधीर मुलांसाठी वाचा प्रशिक्षण केंद्र सुरू असून यामध्ये तीन महिन्यापासून सहा वयोगटातील कर्णबधीर मुलाना वाचा प्रशिक्षण दिले जात आहे. याचा कर्णबधीर मुलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेघना सावईकर, खजिनदार सुषमा तिळवे, सदस्य विजया दीक्षित, वैशाली मातोंडकर, डॉ. स्मिता उसगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन शाळेचे मुख्याध्यापक अवधूत कामत, तसेच इनरव्हील च्या अध्यक्षा सविता डी कोस्ता, सचिव कविता रंगराजु उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा मेघना सावईकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. डॉ. स्मिता उसगावकर यांनी शाळेचे महत्व सांगितले. गोकुळ निवंगुणे, सविता डि कॉस्ता यांनी ख्रिसमस सणाविषयी माहिती दिली. यावेळी मुलांकडून वाचन घेण्यात आले. संस्थेच्या सचिव मुग्धा बोरकर यांनी आभार मानले. आपल्या आजूबाजूला कर्णबधीर मुले आढळल्यास स्वरनाद शाळेमध्ये संपर्क करावा. अधिक माहितीसाठी 8806569666 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.