प्रोबस क्लब फोंडा हिलटाऊनतर्फे व्यवस्थापकांना निवेदन
प्रतिनिधी /फोंडा
प्रोबस क्लब फोंडा हिलटाऊनतर्फे ज्येष्ठ नागरिकांना बॅकेच्या व्यवहारात व पेन्शनची रक्कम गोळा करण्यासाठी तासन् तास उभे राहण्य़ाच्या समस्येसंबंधी स्टेट बॅक ऑफ इंडीया फेंडा शाखेत व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले.
फोंडा शाखेत ज्येष्ठ नागरिकांना बॅक कर्मचाऱयाकडून त्रासदायक वागणूक देण्यात येत आहे. ज्येष्ठासाठी वेगळा काऊंटर नसून सामान्यासाठी असलेल्या काऊंटरवरून कार्यभार हाताळणे भाग पाडत असल्याचो समस्या अनेक ज्येष्ठांनी मांडल्या. मधुमेह, गुडघेदुखी, पाठदुखी असे त्रास असलेल्यानाही कोणतीही सहानभूती नसून झक मारीत रांगेत उभे राहून बॅकेचे कार्य पुर्ण करण्यावाचून गत्यंतर नसल्याचे ज्येष्ट नागरिक व्यथा मांडीत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीचे निवेदन प्रोबस क्लबचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शाखेचे मुख्य व्यवस्थापक अनुभव मिश्रा यांच्या कार्यालयात भेट देऊन सुर्पुद केले.
यावेळी व्यवस्थापकांनी त्वरीत चौकशी करून कारवाईची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. बॅकेत अपुरा कर्मचारी असल्याचे प्रत्युतरादाखल मिश्रा यांनी सांगितले. एकाच काऊंटरवर दोन रांगा करून एक ज्येष्ठांसाठी दुसरी सामान्यासाठी सोय अशी सुचना करून तोडगा काढण्याची आश्वासन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळात प्रोबस क्लब ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, सभासद अशोक केसरकर व बाबलो पारकर हे उपस्थित होते. त्यानंतर सदर शिष्टमंडळ फोंडा पोलीस स्थानकात भेटे देत पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱया समस्येविषयी लेखी निवेदन देत त्याच्यांशी चर्चा केली. समाज कल्याण खाते गोवा सरकार पणजी येथील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलेलें आहे. ज्येष्ठ नागरिकांना असलेल्य़ा हक्काचे पालन व्हावे अशी मागणी केली आहे.