प्रतिनिधी / फोंडा
आडपई दुर्भाट येथे राहणाऱया तसेच चिखली वास्को येथे आरोग्य खात्यात काम करणाऱया एका 52 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे काल शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. मागील तीन दिवसापुर्वी मांगोरहिल परिसरात आरोग्य खात्यातर्फे डय़ुटीवर पाठविण्यात आले होते. कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची रवानगी मडगांव कोविड इस्पितळात करण्यात आली आहे.
या रूग्णाच्या पत्नीची व भावाची कोरोना चाचणी फोंडा उपजिल्हा इस्पितळात करण्यात आली आहे. त्यानंतर त्याना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सदर रूग्ण संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची धास्ती घेत फोंडा पोलिसांनी आडपई नाक्यावर फौजफाटा तैनात केला असून गर्दी होऊ नये या कारणाने फेरीसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी केदार नाईक घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.