प्रतिनिधी/ फोंडा
सिल्वा नगर-फोंडा येथील फातिमा मदरसा येथे लपून बसलेल्या मूळ गुजरात येथील तबलीकी जमातच्या 9 संशयितांना मये रेसिडेन्सी येथील कोरोन्टाईन सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फोंडा पोलिस व मडगांव येथील आरोग्य केंद्राच्या टिमने संयुक्तरित्या काल बुधवारी उशिरा रात्री ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार नऊही संशयित दिल्लीहू 20 मार्च रोजी केरळमार्गे गोव्यात दाखल झाले होते. सर्वांनी निझामुद्दिन दिल्ली येथे झालेल्या तबलीकी जमातच्या जुलुसाला उपस्थिती लावल्याची शक्यता आहे. सर्व संशयित 20 ते 55 वयोगटातील असून मागील 12 दिवसांपासून फातिमा मदरस येथे लपून बसले होते. निझामुद्दिन येथे तबलीकी जमात जुलुस उपस्थिती लावलेले कोरोनाबाधित रूग्ण आढळलेले आहे. त्यानुसार देशाच्या कानाकोपऱयात लपून बसलेल्या संशयितावर कारवाईच्या हालचाली वाढल्या होत्या. मदरसाच्या काही अधिकाऱयांनी याप्रकरणी उपजिल्हा कार्यालयात परवानगी मागण्यासाठीही धडक दिल्याचे व़ृत्त आहे. सर्व नऊही जण गोव्यात दाखल होण्यापुर्वी धार्मिक प्रचार करण्यासाठी गेल्याचे माहिती प्राप्त झाली असून अनेकांच्या संपर्कातही आले आहे. त्यामुळे जोपर्यत कोरोनासंदर्भात चाचणी रिपोर्ट येत नाही तोपर्यत मदरसा परीसरातील लोकांनी धास्ती घेतलेली आहे