प्रतिनिधी/ फोंडा
विविध राजकीय पक्षातील साधारण पन्नाहून अधिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी मगो पक्षात प्रवेश केला. मगोची प्राथमिक सदस्य नोंदणी केल्यानंतर या सर्वांना फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी कुर्टीचे उपसरपंच सुधीर राऊत व माजी पंचसदस्य सज्जाद मुल्ला हे उपस्थित होते.
हे सर्व कार्यकर्ते मगोच्या कार्याने प्रभावीत होऊन उत्स्फूर्तपणे पक्षात सामील झाल्याचे डॉ. भाटीकर यांनी सांगितले. भाजपाने आजवर काँग्रेस व मगोच्या आमदारांची आयात करुनच अनैतिक मार्गाने सत्ता बळकावली आहे. फोंडा पालिकेवरही त्यांचा हाच प्रयोग सुरु असल्याची टिका डॉ. भाटीकर यांनी केली. मगो पक्षाला आपल्या जनसेवा व समाजकार्यावर ठाम विश्वास असून त्याच जोरावर लोकांची मने जिंकून पक्ष पुन्हा सत्तेकडे मार्गक्रमण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.