प्रतिनिधी/ फोंडा
कोल्हापूर येथील ‘अभिषेक बूक सेंटर’चे मराठी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन वारखंडे – फोंडा येथील श्री हनुमान मंदिरच्या सभागृहात भरविण्यात आले आहे. कथा, कादंबरी, नाटक या ललित साहित्याबरोबरच विविध विषयांवरील महितीपर पुस्तके या ठिकाणी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. सकाळी 10 ते रात्री 9 वा.पर्यंत हे प्रदर्शन पुढील काही दिवस चालणार आहे.
इंग्रजी व मराठीतील नामवंत लेखकांची पुस्तके 15 ते 50 टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. इतिहास, राजकारण, चरित्रात्मक प्रवासवर्णन आदी विविध विषयावरील नवीन व जुनी दुर्मिळ पुस्तकांचा साठा वाचकांसाठी उपलब्ध केलेली आहे. लहान मुलांसाठी चित्रमय बालसाहित्य याबरोबरच पाककृती, ज्यातिष, धार्मिक व वैचारीक, पेटींग या अन्य विषयातील पुस्तकेही आहेत.
विजय तेंडुलकर व अन्य मराठी नाटककारांची नाटकांची पुस्तके तसेच इंग्रजीतील अनुवादीत बेस्ट सेलर पुस्तकेही सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. इंग्रजीतील अनेक दर्जेदार पुस्तके रु. 50 व रु. 100 अशा माफक दरातील वेगवेगळी दालने लावण्यात आली आहेत. पुस्तके 100 व 200 रु. किलो हा अन्य एक सवलत योजना या प्रदर्शनात आहेत.