नवे धोरण आखण्याचे संकेत : आगामी काळात मोठे बदल शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन दिग्गज वाहन निर्मिती कंपनी फोर्ड मोटार भारतामध्ये नवीन धोरण आखण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने महिंद्रा ऍण्ड महिंद्रासोबतचे सर्व प्रकल्प थांबविले आहेत. मागील वर्षातील डिसेंबरमध्ये संयुक्त भागीदारीतून वेगळे होत फोर्डने महिंद्राला दुसरा झटका दिला होता.
कंपनीने महिंद्रासोबत नव्याने संबंध प्रस्थापित करुन आपला करार समाप्त करण्याचा पर्यायी विचार केला आहे. यासोबतच वाहन निर्मितीशी संबंधीत असणारे दोन करार यावेळी केले आहेत. यामुळे फोर्ड यासंदर्भात एक महिन्याच्या आतमध्ये एखादा निर्णय घेण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. कारण फोर्डचे सीईओ जिम फर्ले हे भारतामध्ये अधिकच्या नफा कमाईचा रस्ता शोधत आहेत.
महिंद्रा आणि फोर्डची भागीदारी समाप्त
महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि फोर्ड यांच्यामध्ये असलेल्या जॉइंट वेंचरसह अन्य करार समाप्त झाले आहेत. यासोबतच दोन्ही कंपन्या भारतात आणि स्पर्धात्मक बाजारासाठी काम करणार असल्याचा अंदाज आहे.
फर्लेच्या नेतृत्वात मोठे बदल
मागील वर्षातील ऑक्टोबरमध्ये फर्ले यांनी सीईओपद स्विकारल्यानंतर फोर्ड मोटार कंपनीने जवळपास 11 अब्ज डॉलरची पुनर्बांधणीची योजना आखली असून याच्या आधारे जागतिक पातळीवर निवडक बदल करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
फोर्डचा प्रवेश 25 वर्षांपूर्वी
फोर्डने भारतामध्ये 25 वर्षापूर्वी प्रवेश केला होता. परंतु कंपनीने भारतीय बाजारात केवळ 3 टक्के हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. भारताच्या कार बाजारात सुझुकी मोटार कॉर्प आणि हय़ुंडाई मोटर वर ताबा मिळवला आहे.