नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी फोर्डने आपल्या कार्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास सर्वच गाडय़ा यापुढे महागणार आहेत. सर्वाधिक किमतीत वाढ करण्यात आलीय ती ‘एंडेवर’ या गाडीवर तर ‘एस्पायर’ या गाडीची किंमत तुलनेने कमी वाढविण्यात आली आहे. सेडान कार ‘एस्पायर’ची किंमत 3 हजाराने वाढविण्यात आलीय. एसयुव्ही प्रकारात ‘फोर्ड इकोस्पोर्ट्स’च्या काही गाडय़ांच्या किमती 20 हजारापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे ‘एंडेव्हर’ या गाडीची किंमत 70 ते 80 हजार रुपये वाढविण्यात आली आहे.