नवी दिल्ली
वाहन क्षेत्रातील कंपनी फोर्ड आणि एमजी मोटर्सने एप्रिलमध्ये कार विक्रीत घट नोंदवली आहे. फोर्डच्या कार विक्रीत 29 टक्के तर एमजी मोटर्सच्या कार विक्रीत 53 टक्के इतकी घट झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल 2021 मध्ये फोर्डच्या 5 हजार 469 कार्सची विक्री झाली आहे. महिन्याच्या तुलनेत पाहता विक्रीत 29 टक्के इतकी घट नोंदली गेली आहे. मार्च 2021 मध्ये 7 हजार 746 कार्सची विक्री झाली होती. तर दुसरीकडे एमजी मोटर्सने एप्रिल 2021 मध्ये 2 हजार 565 कार्सची विक्री केली आहे. मार्चमध्ये कंपनीने 5 हजार 528 कार्स विकल्या होत्या. म्हणजे मार्चच्या तुलनेत 53 टक्के विक्री घटली आहे.