मुंबई
दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जियोने आपला दबदबा कायम ठेवला आहे. 4 जी डाऊनलोडच्या बाबतीत जियोचा वेग हा सर्वात सरस ठरला आहे. रिलायन्सने इतरांना 4 जी डाऊनलोडच्या वेगात एअरटेल व व्हीआय (व्होडाफोन-आयडिया) यांना मागे टाकले आहे.
सप्टेंबरमध्ये वेगाची चाचणी तपासण्यात आली. त्यात रिलायन्सचा वेग 20.9 एमबीपीएस इतका मोजला गेला. ऑगस्टच्या तुलनेत जियोच्या सप्टेंबरमधील 4 जी डाऊनलोड प्रक्रियेत अधिक प्रगती दिसली आहे.