प्रतिनिधी /बेळगाव
द इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमन, बेळगाव, ब्युरो ऑफ एनर्जी एफियन्सी, प्राईस वॉटर हाऊस कॉपर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एनर्जी मॅपिंग, स्टडी फॉर फौंड्री एमएसएमई सेक्टर’ या विषयावर ही कार्यशाळा झाली. उद्यमबाग येथील बेळगाव फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्राईस वॉटर हाऊस कॉपर्स प्रा. लि. चे व्यवस्थापक ए. नंदगोपाल उपस्थित होते. त्यानी विकसीत उर्जा वापराची पातळी व त्याचे निकष विशद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फौंड्री सेक्टरमधील उर्जेचा वापर कसा कमी करता येईल, हे त्यानी सांगितले. त्यांनी बेळगाव फौंड्री उद्योजकांशी संवाद साधून अनेक उपयुक्त असे सल्ले दिले. 2030 पर्यंतचा फौंड्रीसाठीचा प्लॅन त्यांनी सांगितला.
फौंड्रीमन संघटनेचे चेअरमन महेश कुदळे यांनी स्वागत केले. सेपेटरी आदित्य पारिख यांनी आभार मानले. क्लस्टरचे पदाधिकारी सदानंद हुंबरवाडी यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बेळगाव परिसरातील फौंड्री उद्योजक उपस्थित होते.