वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फ्रँकलिन टेंपलटन ही म्युच्युअल फंडमध्ये कार्यरत असणारी कंपनी कोरोनाच्या संकटामुळे भारतामधील सहा योजना बंद करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे जवळपास 28 हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांचे अडकून पडल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.
कंपनीने योजना बंद करण्याचा विचार केला आहे. त्यामध्ये एकूण सहा योजनांचा समावेश आहे. प्रामुख्याने फ्रँकलिन इंडिया लो डय़ूरेशन फंड, फ्रँकलिन इंडिया डायनॅमिक ऍक्मयूरल फंड, फ्रँकलिन इंडिया पेडिट रिस्क फंड, फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इनकम प्लॅन, फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉण्ड फंड आणि फ्रँकलिन इंडिया इनकम ऍपोर्च्युनिटीज फंड आदी योजनांचा समावेश असल्याची माहिती आहे.
बंदचे कारण
फ्रँकलिन टेंपलटन म्युच्युअल फंडने युनिट रिटर्न करणे आणि बॉण्ड बाजारातील झालेल्या कमी व्यवहारांचा दाखला देत सदरच्या योजना रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.