एकत्रितपणे उभारणार सोलार प्रकल्प उभारण्याचा मानस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्सची कंपनी टोटल एसए यांनी अदानी समुहात 3 हजार 707 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. टोटलने अदानी ग्रीन एनर्जी लिलिटेड (एजीइएल) सोबत एकत्र येऊन 50-50 टक्क्मयांची भागीदारीसह ही एकत्रित गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासोबतच 11 राज्यांत सोलार प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
एजीइएलने सोलार उर्जा कॉर्पच्या 8 गीगावॅट प्रकल्पासाठी बोली लावण्यात आली आहे. एजीइएलने सांगितले आहे, की 2025 पर्यंत सर्वात मोठी सोलार कंपनी आणि 2030 पर्यंत सर्वात रिन्यूएबल ऊर्जा कंपनी होण्याचे ध्येय आहे. यासाठी अर्थसंकल्पात 70 टक्के स्वच्छ उर्जा आणि ऊर्जा सिस्टमसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा संकल्प केला आहे. एजीइएलच्या पोर्टफोलियोत सध्या 6 गीगावॅटचे प्रकल्प आहेत. परंतु कंपनीने सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 8 गीगावॅटच्या प्रकल्पासाठी टेंडरसाठी योजना केली आहे.
25 गीगावॅट क्षमतेचे ध्येय
दोन्ही समुहाकडून एकत्रित काम करुन एका उच्च पातळीवर काम करण्यात येणार आहे. दोघांमधील भागीदारी मजबूत होण्याचे संकेत आहेत. एजीइएलच्या माहितीनुसार या प्रकल्पातून आगामी 2025 पर्यंत 25 गीगावॅट इतक्मया क्षमतेची वीज निर्मिती करण्याचे ध्येय निश्चित केल्याचे सांगितले आहे.