ऑनलाईन टीम / पॅरिस :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फ्रान्समध्ये दुसरा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर देशात तब्बल 700 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
फ्रान्समध्ये 1 महिन्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. त्यामुळे देशातील 6.7 कोटी नागरिकांना डिसेंबर सुरुवातीपर्यंत घरातच राहावे लागणार आहे.
न्यूज एजन्सी एपीच्या माहितीनुसार, लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी गुरुवारी संध्याकाळी पॅरिसच्या रस्त्यावर आणि आजूबाजूच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. अंदाजे 700 कि.मी.पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सामान खरेदी, तसेच वैद्यकीय कारणे आणि व्यायामासाठी एक तास घराबाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.