प्रतिनिधी / बेळगाव
आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने बेळगाव येथील फ्रेंड्स फॉउंडेशन ग्रुपने गरजुंना मदत करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसापासून शहरातील सर्व गरजू आणि गरीब व्यक्तींना एक वेळचे जेवण देऊन मदत करण्यात येत आहे.
मध्यवर्ती बस स्थानक, पी बी रोड, क्लब रोड, चन्नम्मा सर्कल, एपीएमसी मार्केट, रेल्वे स्थानक, जिल्हा रुग्णालय यासह अनेक ठिकाणी जाऊन मदत करण्यात येत आहे.
या लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद असल्यामुळे तसेच हाताला काम नसल्याने चार पैसे मिळणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे एकवेळच्या जेवणासाठी गरजुंना धडपड करावी लागत आहे.
गेल्या 12 दिवसांपासून उपक्रम सुरूच
फ्रेंड्स फौंडेशन ग्रुपच्यावतीने फळे, अंडी, पाण्याची बॉटल, जेवण देऊन मदत करण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी भटक्मया कुत्र्यांना जेवण देवून त्यांचीही भूक भागविली जात आहे. या प्रेंड्स फॉउंडेशनने पहिल्यांदा हा उपक्रम राबविला असून गेल्या 12 दिवसांपासून हा उपक्रम चालू आहे.
उपक्रमाला रितेश जुवेकर, विजय चौगुले, महेश पाटील, राहुल पाटील, रवी चौगुले, विनायक कोकितकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते मदत करून आपला हातभार लावत आहेत.