प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 20 दिवसांपासून प्रेंड्स फाऊंडेशन ग्रुप शहरातील गरजूंना मदत देण्याचे कार्य करत आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असलेल्या गरजूंना मदत देऊन समाजोपयोगी कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाहणी केली आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ते म्हणाले की, प्रेंड्स फौंडेशन ग्रुप चांगले काम करत आहे. मित्रांनी मिळून सदर कार्य सुरू केल्यामुळे गरजूंना मदत होत आहे. अशीच मदत समाजातील दानशूर व्यक्तींनी करावी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रेंड्स फाउंडेशन ग्रुपला धान्यरुपी मदत दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी राहुल मुचंडी, नागेश लंगरकांडे, प्रताप जुवेकर आणि प्रेंड्स फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.