प्रतिनिधी / बेळगाव
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रेंड फौंडेशन ग्रुपने शहरातील वसंतरहित आश्रय केंद्राला मदतीचा हात दिला आहे. या केंद्रातील वृद्धांना जेवणाचे वाटप करून समाजाला मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला आहे.
सदर फौंडेशनच्यावतीने लॉकडाऊन काळात दररोज गरजूंना जेवण देण्यात येते. भाजी मार्केट, किल्ला परिसर, जिल्हा रुग्णालय, पी बी रोड यासह अनेक ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निराधारांना अन्न वाटप करून जनसेवा करण्याचे कार्य या संस्थेमार्फत सुरू आहे.