प्रतिनिधी / आटपाडी :
भारताचे जगप्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांना आटपाडी येथे श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी सलग १९ किलोमीटर धावून अभिवादन केले.
भारताला ऑलम्पिक मध्ये नावलौकिक मिळवून देणारे धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना देशभरातून विविध प्रकारे श्रद्धांजली वाहिली गेली. मात्र मिल्खासिंग यांना इतराप्रमाणे औपचारीक श्रद्धांजली न वाहता मिल्खासिंग यांच्या कर्तुत्वाला साजेल अशा पद्धतीने श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी 19 किलोमीटर धाऊन श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्यासह या दौडीत अर्जुन काळे, पृथ्वीराज देशमुख यांनी देखील सहभाग घेतला. सलग 2 तास 22 मिनिटे रनिंग करून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. ही अनोखी श्रद्धांजली चर्चेचा विषय बनली आहे.