वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दिग्गज ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने त्यांच्या होलसेल युनिट वॉलमार्ट इंडियाची कॅश ऍण्ड कॅरी या व्यवसायाचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात फ्लिपकार्ट होलसेलचे सादरीकरण करणार आहे.
कंपनीची नजर देशतील 650 अब्ज डॉलरच्या के बी 2 बी रिटेल मार्केटवर राहणार आहे. वॉलमार्टने भारतामध्ये 28 बेस्ट प्राईस होलसेल स्टोअर सुरु केली आहेत. एक आठवडय़ापुर्वी फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार त्यानी वॉलमार्टसोबत इनवेस्टर गुपच्या मदतीने 1.2 अब्ज डॉलरचा निधी जमा केला आहे.
सदर निणर्यामुळे वॉलमार्टचा रिटेल पेर्टफोलियो फ्लिपकार्ट ग्रुपही मजबूत होणार आहे. जवळपास दोन वर्षाच्या अगोदर वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये 77 टक्के हिस्सेदारी 16 अब्ज डॉलरला खरेदी केली होती. यामुळे सध्याच्या जिओच्या होत असणाऱया हालचाली लक्षात घेता फ्लिपकार्ट येत्या महिन्यात फ्लिपकार्ट होलसेलचे सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे.
प्रवास नव्या बदलाचा
वॉलमार्ट इंडियाचे कर्मचारी फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये जाणार आहेत. यात बेस्ट प्राईस ब्रँड आपली 28 स्टोर आणि ई कॉमर्स ऑपरेशन्स सुरु ठेवणार आहे. सदरच्या अधिग्रहाणामुळे फ्लिपकार्ट होलसेल सादरीकणानंतर कंपनी आपली वेगळी उंची प्राप्त करण्यासाठी टेक्नालॉजी, लॉजिस्टीक आणि फायनान्सच्या आधारे लहान व्यवसायांना चालना देणार असल्याची माहिती फ्लिपकार्टचे समूह सीईओ कल्याण कृष्णमृर्ती यांनी सांगितले आहे.