वृत्तसंस्था/ बेंगळूर
इ कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्ट भारतातील आदित्य बिर्ला फॅशन व रिटेल लि. मध्ये 8 टक्के इतका हिस्सा खरेदी करणार आहे. ही खरेदी 1500 कोटी रुपयांना होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
वॉलमार्टची कंपनी फ्लिपकार्टचा हा व्यवहार लवकरच पूर्ण होणार आहे, असे सांगण्यात येते. फॅशन रिटेलला भारतात भविष्य असून येणाऱया काळात हा व्यवसाय अधिक मागणीत असणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट ही संधी साधून आदित्य बिर्लात गुंतवणूक करण्यास उत्सुक झाली आहे.
आदित्य बिर्ला समुह
बिर्ला समुहाचा फॅशनसह विविध क्षेत्रात व्यवसाय आहे. समुहाचे मुख्यालय वरळी, मुंबई येथे असून कंपनीचे जाळे 34 देशांमध्ये पसरले आहे. कंपनीत 1 लाख 20 हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. 1857 साली सेठ शिव नारायण बिर्ला यांनी या समुहाची सुरूवात केली.