वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्लिपकार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)कल्याण कृष्णमूर्ती यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिमारामन यांची भेट घेतली आहे. सदरच्या बैठकीत देशातील विविध विक्रेते तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग यांच्यासोबत आपली कंपनी जोडण्यासंबंधी अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे. तसेच ई कॉमर्सवर अन्य कलाकार व अन्य क्षेत्रांना खरेदीदारांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय असून यासाठी मदत मिळण्याची कृष्णमूर्ती यांनी विनंती केली आहे. या भेटीचा फोटो अर्थमंत्रालयाच्या कार्यालयाकडून ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.