नवी दिल्ली
ऑनलाइन रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट लवकरच आपला आयपीओ भांडवली बाजारात दाखल करणार असल्याचे समजते.
सदरचा आयपीओ आणण्याआधी काही संचालकांची नियुक्ती करण्यात येते. यानुसार फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांना मंडळावर संचालकपदी नेमले आहे. याव्यतिरिक्त उपाध्यक्ष केकी मिस्त्री, सुरेश कुमार यांची तसेच लेघ हॉकिन्स यांचीदेखील मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये 2022 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रात उतरण्याआधी आपल्या मंडळावर कंपनीने वरील सदस्यांची नियुक्ती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फ्लिपकार्ट आपला आयपीओ दाखल करणार आहे. अमेरिकेतील मोठी रिटेलर कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक केली आहे.