17 जानेवारीनंतर सदरचा सेल होणार सुरु
नवी दिल्ली
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनने रिपब्लिक सेलची घोषणा केली आहे. ऍमेझॉनने या सेलला ‘ग्रेट रिपब्लिक डेज सेल’ असे नाव दिले आहे. जो 17 ते 20 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये प्राईम मेंबर्सना या सेलमध्ये 16 जानेवारीपासूनच भाग घेता येणार आहे. यासोबतच फ्लिपकार्ट सेलचे नाव ‘बिग सेव्हिंग डेज सेल’ असून याचा प्रारंभ हा 17 जानेवारी रोजी सुरु होऊन 22 जानेवारी रोजी समाप्त होणार असल्याची माहिती आहे.
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलच्या दरम्यान बायर्सला आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिटकार्डवर 10 टक्क्यांची सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. दुसऱया बाजूला ऍमेझॉन गेट रिपब्लिक डे सेलमध्ये वनप्लस, शाओमी, सॅमसंग, आईकू, ऍपल आणि अन्य टॉपच्या ब्रँड्सचा समावेश राहणार आहे. यासोबतच टीव्हीच्या खरेदीसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍक्सेसरीजच्या बाबत इंटेल, एचपी, बोट, लेनोवो आदीवर विशेष सवलत मिळणार असल्याचे संकेत आहेत.
व्हिडिओ गेम्सवरही सवलत
सदरच्या सेलमध्ये व्हिडिओ गेम्सवर 55 टक्केपर्यंत सुट आहे. तसेच फायर टीव्ही डिव्हाईसवर 48 टक्के सवलत मिळते. इको स्मार्ट स्पीकर्सवर चर्चा करता येणार आहे. काही नवीन सादर होणाऱया स्मार्टफोनसह अन्य उत्पादनांचाही यामध्ये समावेश होणार असल्याची माहिती आहे.