रिटेल क्षेत्रास लाभ मिळण्याचे संकेत : 2021 ते 2022 पर्यंत येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीओ बाजारामध्ये काही कंपन्या आपला आयपीओ आणण्याची तयारी करीत आहेत. आयपीओ आणणाऱया कंपन्यांमध्ये प्रामुख्याने फ्लिपकार्ट, पेटीएम झोमॅटो, बिग बास्केटसह अन्य कंपन्यांचा समावेश राहिलेला आहे. सदरच्या कंपन्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये किंवा 2022 मध्ये आयपीओ आणण्याची शक्मयता आहे.
या कंपन्या आपला आयपीओ बाजारात दाखल करुन भारतीय बाजाराला तेजी प्राप्त करण्यास मदत करणार असल्याचे संकेत आहेत. रिटेल गुंतवणूकदार या आयपीओमध्ये आपली आवड दाखवण्याची शक्मयताही आहे. तसेच काही आयपीओमध्ये या कंपन्यांचा हिस्सा हा जवळपास 35 ते 40 टक्क्यांची भर घालणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
रिटेलची भागीदारी तेजीत
या कंपन्यांच्या आयपीओमुळे रिटेल गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रामुख्याने ई कॉमर्स, फिनटेक आणि फूड डिलिवरी आदी कंपन्यांचा यात समावेश राहिलेला आहे.