ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतातील ‘फ्लिपकार्ट’ ही ई-कॉमर्स कंपनी आता ऑनलाईन सेवेद्वारे घरोघरी ताजी भाजी आणि फळे विकणार आहे. लवकर या प्रोजेक्टला हैदराबादमधून सुरूवात होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फ्लिपकार्ट आता ताजी भाजी आणि फळे ग्राहकांना ऑनलाईन सेवेद्वारे पुरविण्यात उत्सूक आहे. त्यासाठीचा परवाना घेण्याचे काम फ्लिपकार्टकडून सुरू आहे. तसेच ही सेवा पुरविण्यासाठी कंपनीने वेकूल फूड अँड प्रॉडक्ट्ससोबत भागिदारी केली आहे.
सध्या फ्लिपकार्ट सोबत स्पर्धेत असलेल्या ऍमेझॉन कंपनीकडून ही सेवा काही ठिकाणी पुरविण्यात येते. त्यामुळे फ्लिपकार्टने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजीपाला आणि फळे पुरवठय़ाची चेन आणि रेग्युलेटरी कंप्लायन्समधील गुंतागुंतीमुळे ही बाब रखडली होती. आता हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी फ्लिपकार्टने तयारी सुरू केली आहे. लवकरच या प्रोजेक्टद्वारे ग्राहकांचा स्वभाव आणि सप्लाय चेनचा आभ्यास करण्यात येणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.