मुंबई
ताज्या उत्पादनांचा पुरवठा करणाऱया निंजाकार्ट या कंपनीत फ्लिपकार्ट इंडिया व वॉलमार्ट या कंपन्यांनी 145 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय. मागच्या ऑक्टोबरमध्ये बेंगळूरमधील या कंपनीत गुंतवणूक करण्याचे निश्चित केले होते. या ताज्या गुंतवणूकीमुळे कंपनीला कृषी क्षेत्रातील आपल्या व्यवसायाला अधिक आधुनिकतेची जोड देता येणार आहे. निंजाकार्ट शेतकऱयांच्या ताज्या उत्पादनांचा आपल्या प्लॅटफॉर्मवर पुरवठा करते.