वृत्तसंस्था/नवी दिल्ली
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल नुकताच समाप्त झाला आहे. वॉलमार्टची मालकी असणारी ही ई कॉमर्स कंपनी आहे. हिने पहिल्या पाच दिवसांमध्येच तब्बल 10 दशलक्ष ऑर्डर्स प्राप्त केल्या आहेत. कंपनीने स्मार्टफोन्स, फॅशन, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि जनरल मर्चेंडाइज आदी वर्गातील उत्पादनांच्या विक्रीचा नवा टप्पा गाठला आहे.
ई कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांच्या विक्रीत अधिक वाटा उचलण्यात फ्लिपकार्टला मोठय़ा प्रमाणात यश मिळाले आहे. यामध्ये 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल पार पडला होता. ऑनलाईनवर अधिकाधिक ग्राहकांनी संपर्क साधल्याने अनेक ग्राहकांना आपली ऑर्डर मिळवणे कठीण झाले होते. परंतु सदरची स्थिती काही कालावधीत सुधारत गेली आहे.