प्रतिनिधी/ सातारा
नवीन आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱया महिन्यात ‘मे’ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 9 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुटय़ांमुळे 5 दिवस बँका बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसऱया आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे 2021 मध्ये बँका एकूण 9 दिवस बंद राहतील.
पुढील महिन्यात महाराष्ट्र दिन, रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बँक बंद असणार आहेत. सध्या देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह बँकांचे कामकाजाचे तास ही कमी करण्यात आले आहेत. सध्या सकाळी 10 ते दुपारी 2 या बँका सुरू आहेत. त्यामुळे आता नागरिकांना आपापली बँकांसंबंधीची कामे वेळेत उरकावी लागणार आहेत.