शासकीय कार्यालयेही बंद, एटीएमवर पडणार भार
प्रतिनिधी /बेळगाव
आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. शुक्रवारी गणेशचतुर्थी तर शनिवारी महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएमवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्मयता आहे.
दरम्यान, बँकांप्रमाणेच इतर शासकीय कार्यालयांनाही तीन दिवस सुटय़ा असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामासाठी सोमवारची वाट पहावी लागणार आहे.
सणासुदीच्या काळात एटीएममधून मोठय़ा प्रमाणात रोकड काढली जाते. बँका बंद असल्याने नागरिक या काळात एटीएमवर अवलंबून असतात. नोटा बंदीनंतर शासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. मात्र रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे एटीएमवर अधिक भर आहे. दरम्यान, बँका सलग तीन दिवस बंद असल्याने एटीएमवर ताण वाढणार आहे.