वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी लडाखमधील गलवान खोऱयातील चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पडसादामुळे बाजारात चढ उताराच्या प्रवासात घसरणीचे सत्र राहिले होते. परंतु यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होत गुरुवारी मात्र बँकिंग क्षेत्रातील कामगिरीने आणि भारत चीन यांच्यातील चर्चा करण्यात येणार असल्याच्या दोन्ही देशाच्या आश्वासनाच्या प्रभावामुळे गुरुवारी सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला असल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक बाजाराचा कल मात्र घसरणीचा राहिल्याचाही लाभ देशातील बाजाराला झाला आहे.
दिवसभरात प्रामुख्याने एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते आणि यांच्या जोरावरच सेन्सेन्स दिवसअखेर 700.13 अंकानी वधारुन निर्देशांक 34,208.05 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 210.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,091.65 वर बंद झाला. दुपारपर्यंत शेअर बाजारात प्रामुख्याने बँकिंग, आर्थिक आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये लिलाव झाला आहे. याचाही प्रभाव राहिला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये कोटक बँक, भारतीय स्टेट बँक, पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, टीसीएस, ओएनजीसी आणि मारुती सुझुकी यांचे समभाग घसरले आहेत.
आशियाई शेअर बाजारातील कल हा काहीसा मिळता जुळता राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आशियाई विकास बँकेने म्हटले आहे, आशियात 2020 मध्ये काही प्रमाणात वृद्धी घटण्याची शक्मयता व्यक्त केली आहे तर हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजार नुकसानीत राहिले होते.