प्रतिनिधी / वारणानगर
सातवे ता पन्हाळा येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील खाते बंद करणेचे सांगत दंगा करून बॅकेच्या कामकाजात अडथळा, बँकेच्या शाखाधिकारी यांचे विरूध्द वरीष्ठ अधिकारी यांचेकडे केलेली खोटी तक्रार सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करुन फिर्यादी व बॅकेची नाहक बदनामी केली प्रकरणी रघुनाथ काटे, धनाजी सावंत ( रा.सातवे ता पन्हाळा ) यांचे विरूध्द कोडोली पोलीसांत गुन्हा दाखल करणेत आला आसून या बाबतची फिर्याद शाखाधिकारी वैशाली मोतिराम दाते यांनी दिली आहे.
याबाबत पोलीसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, रघुनाथ काटे व धनाजी सावंत दि ९ ऑक्टोबर रोजी बँकेत येवून खाते बंद करावयाचे असे म्हणत दंगा करुन शाखाधिकारी दाते यांच्या बँकेच्या कामात अडथळा आणला. यावेळी इतर कर्मचारी यांनी त्यांना दंगा करू नका म्हणून सांगत होते. त्यावेळी त्यांनी इतरांनाही शिवीगाळ करुन धमकी दिली. या दोघांनी गावातील लोकांच्या सह्या घेवून युनियन बँकेच्या वरीष्ठ अधिकारी यांचेकडे शाखाधिकारी यांचे विरुध्द तक्रार केली.
वरिष्ठ अधिकारी यांचेकडे केलेल्या तक्रारारींची प्रत आरोपींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविली. या माध्यमातून केलेल्या तक्रारारीची प्रत पसरून शाखाधिकारी व बँकेची नाहक बदनामी केली असल्याचे शाखाधिकारी दाते यांनी दिलेल्या फिर्यादित नमूद करणेत आले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे करीत आहे.