प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील एका शासकीय कर्मचाऱयास वारंवार क्रेडीट कार्ड सुरु करण्यासाठी सांगत एका अनोळखी व्यक्तीने बँक अकौंटची माहिती घेवून त्या क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करण्यास सांगितले. त्यानंतर अनोळखीने वन प्लस स्टोअर त्या अकौंटचा वापर करत 45 हजार 899 रुपयांची खरेदी करत फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालीय.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार रामचंद्र बाबूराव घाडगे (वय 58, रा. महावीर रेसिडेन्सी, भोसले मळा, सातारा) हे पाटबंधारे खात्यात नोकरीस आहेत. त्यांना दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून (9458553439) या मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा फोन येत होता. ती व्यक्ती घाडगे यांना तुमचे क्रेडिट कार्ड सुरु करा व त्यासाठी क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करा असे सांगत होती. त्याप्रमाणे घाडगे यांनी पिन जनरेट केला.
मात्र, त्यानंतर एक दिवस एसबीआय बँकेकडून घाडगे यांना 45 हजार 899 रुपयांची खरेदी त्यांनी वन प्लस स्टोअर इनवर केली असल्याचा मेसेज आला. घाडगे यांनी कोणतीची खरेदी केली नव्हती. त्यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांनी न वापरलेल्या नवीन कार्डवरुन (9458553439) हा क्रमांक वापरणाऱया अनोळखीने बँक अकौंट हॅक करुन हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आला. त्यानंतर घाडगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.