कोविडच्या वाढत्या चिंतेने बाजार प्रभावीत : निफ्टी 10,312.40 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली आहे. कारण सध्या जगभरातील कोविड19 ची संख्या ही वेगाने वाढत असून जवळपास 1 कोटीचा टप्पा पार केला आहे. हीच स्थिती देशात असून विविध राज्यांमध्ये शिथिलता दिली असल्याने कोविडची संख्या वेगाने वाढत असल्याचा प्रभाव शेअर बाजाराच्या कामगिरीवर झाल्याचे दिसून आले आहे.
दिवसभरातील व्यवहारानंतर दिवसअखेर सेन्सेक्स 209.75 अंकांनी घसरुन 34,961.52 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 70.60 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,312.40 वर बंद झाला आहे. याच दरम्यान बँक आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याने शेअर बाजारात घरसण नेंदवण्यात आली आहे. दिवसभरातील कामगिरीवर दरम्यान सेन्सेक्सने 509 अंकांनी नीचांकी पातळी गाठली होती.
प्रमुख कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 5 टक्क्मयांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, स्टेट बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एनटीपीसी यांचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, एचयुएल, कोटक बँक व भारती एअरटेल यांच्या समभागात तेजीचा सूर दिसून आला.
जगातील विविध देशातील कोविड रुग्णांची आकडेवारी आणि त्यामधून मृत्यू पावणाऱयांची संख्या 5 लाखाच्या घरात गेली असल्याने पुन्हा नव्याने कोविडची धास्ती पहावयास मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दुसरी बाब म्हणजे भारत चीन सीमा वाद आणि अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युद्ध यामुळे काही प्रमाणात सुरु झालेल्या उद्योगधंद्यामुळे अर्थक्यवस्थेला मिळणाऱया बळकटीला ब्रेक लागण्याची चिंताही व्यक्त होत आहे.