नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ बडोदाने आपल्या व्याजदरात कपात करत कर्जदारांना दिलासा दिला आहे. बँकेने एमसीएलआर व्याजदरात 0.05 टक्के इतकी घट केली आहे. सदरचे नवे व्याजदर 12 जून 2021 पासून अंमलात येणार आहेत. आता बँकेचा वर्षाकरीताचा व्याजदर 7.35 टक्के आणि 6 महिने आणि 3 महिन्याच्या अवधीसाठी अनुक्रमे 7.20 टक्के, 7.10 टक्के इतका असणार आहे. शेअर बाजारात बँकेचा समभाग दिवसअखेर 3 टक्के वाढून 84 रुपयांवर बंद झाला आहे.