प्रतिनिधी/ बेळगाव
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दि. 15 व 16 मार्च रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमच्या बेळगाव शाखेने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, 15 व 16 रोजी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून दि. 15 रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी चौक येथून रॅली निघणार असुन, कॉलेजरोड ते चन्नम्मा सर्कल असा रॅलीचा मार्ग आहे. दि. 16 रोजी सकाळी 10.30 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. सर्व बँक कर्मचाऱयांनी सहभागी होण्याचे आवाहन युनियनचे समन्वयक एकनाथ गिंडे यांनी केले आहे.